बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

file photo
file photo

चंद्रपूर : जिल्ह्यामध्ये बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सिंदेवाही तालुक्‍यातील गडबोरी येथे बिबट्याने एका महिलेला ठार मारले. गयाबाई पैकू हटकर (65 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या वृद्धेला बिबट्याने घरातून फरफटत नेल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गयाबाई झोपलेल्या असताना बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला. बिबट्याने खाटेवर झोपलेल्या गयाबाईंना फरफटत नेले. वयोवृद्ध असल्याने गयाबाई प्रतिकार करू शकल्या नाही. विशेष म्हणजे, 2 जून रोजी सुद्धा याच गावात बिबट्याने 9 महिन्यांच्या राकेश गुरनुले या बाळाला उचलून नेले होते. या घटनेनंतर एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते. तरीदेखील पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे. गडबोरीच्या जंगलात तीन ते चार बिबटे असून ते सर्व मानवी वस्तीसाठी धोकादायक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com