पोलिस कर्मचाऱ्याचा घरात शिरला बिबट्या

अनिल कांबळे
रविवार, 15 एप्रिल 2018

त्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावद राखत बाथरूमचे दार बंद केले, पोलिस आणि वन विभागाला घटनेची माहिती दिली. सध्या बिबट्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

नागपूर : नागपूरच्या हिंगणा मार्ग सीआरपीएफ गेट जवळील पोलिस नगरात एक पोलिस कर्मचाऱ्याचा घरात शिरला बिबट्या शिरल्याने एकाच खळबळ उडाली.

सकाळी हा बिबट्या त्या परिसरात फिरत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्या नंतर तेथे गोंधळ झाल्याने त्या बिबट्याने पोलिस कर्मचारी पराग बायस्कर बाथरूममध्ये जाऊन लपला.

त्या पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावद राखत बाथरूमचे दार बंद केले, पोलिस आणि वन विभागाला घटनेची माहिती दिली. सध्या बिबट्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

Web Title: leopard in police home nagpur