सावरी येथील शाळेच्या प्रसाधनगृहात बिबट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

भद्रावती (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील सावरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील प्रसाधनगृहात गुरुवारी (ता. 8) बिबट घुसला. त्याचवेळी प्रसाधनगृहाचे दार बंद झाल्याने तो त्यात अडकला. या प्रकारामुळे शाळा तथा गावात एकच गोंधळ उडाला. बिबट्याच्या सुटकेसाठी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्याच्या मदतीने या बिबट्याला जेरबंद करून नजीकच्या जंगलात सोडण्यात आले.

भद्रावती शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर सावरी गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. हे गाव जंगल परिसरात वसले आहे. सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एक बिबट शाळेच्या आवारातील प्रसाधनगृहात शिरला. शाळेच्या आवारातच अंगणवाडी आहे. अंगणवाडीसेविका मुलींना प्रसाधनगृहाकडे घेऊन गेल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली. तिने हा प्रकार मुख्याध्यापकांना सांगितला. मुख्याध्यापक राजू बलकी यांनी प्रसंगावधान राखत बाहेरून दार बंद केले. जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे अधिकारी, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पंचायत समितीच्या सभापती विद्या कांबळे, संवर्ग विकास अधिकारी, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पिंजऱ्याच्या मदतीने प्रसाधनगृहात अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर नजीकच्या ताडोबा अभयारण्याच्या जंगल परिसरात त्याला सोडण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard at the school's toilet in Sawari