खोबा हलबी परिसरात बिबट्याने केली शेळीची शिकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

सडक अर्जुनी (गोंदिया) : खोबा हलबी परिसरात बिबट्याने शनिवारी (ता. 21) एका शेळीला ठार केल्यानंतर, रविवारी (ता. 22) रात्री पुन्हा एका शेळीची शिकार केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

खोबा हलबी येथील रामदास राऊत यांच्या घरी गोठ्यात बांधलेली शेळी शनिवारी (ता. 21) रात्रीला बिबट्याने ठार केली. त्यामुळे नागरिक भयभीत असतानाच पुन्हा रविवारी (ता. 22) रात्रीला नरेश कुरसुंगे यांच्या मालकीच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीचा फडशा पाडला. दोन्ही पशुमालकांनी नुकसानभरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला आहे. त्यानुसार, वनविभागाने पंचनामा केला. पाऊलखुणावरून शेळीची शिकार करणारा बिबट नाही तर, तळस (कुबड्या) असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, बिबट्याच्या या दहशतीमुळे लहान मुले-मुली व नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने दखल घेऊन या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopards hunting Goat in the Khobi Halbi area

टॅग्स