वाहनाच्या धडकेने बिबट्या जागीच ठार

अनिल दंदी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

बाळापूर (अकोला) : शेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आज मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून अपघाताची माहिती मिळताच वनविभागाच्या अधीकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
अकोला येथे शवविच्छेदन करून बिबट्याचे वन विभागाच्या हद्दीत दफन करण्यात आले.

बाळापूर (अकोला) : शेगाव मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आज मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास हि घटना घडली असून अपघाताची माहिती मिळताच वनविभागाच्या अधीकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. 
अकोला येथे शवविच्छेदन करून बिबट्याचे वन विभागाच्या हद्दीत दफन करण्यात आले.

याबाबतची माहिती अशी की, बाळापूर तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या बाळापूर - शेगाव मार्गावर मंगळवारी एक वाजताच्या सुमारास बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी अज्ञात भरधाव वाहनाने बिबट्याला जोराची धडक दिली. या वेळी थांबलेल्या प्रवाशांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. अती रक्तस्राव झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. हा मादी बिबट्या असून वय अंदाजे अडीच वर्षे आहे. अपघाता नंतर संबंधित वाहन घटनास्थळावरून पसार झाले. बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात आणले. शवविच्छेदना नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील महामार्गालगत थोडे बहूत जंगल आहे. त्यामुळे या परिसरात हरीण, ससे, लांडगे, तरस, अशा वन्य प्राण्यांसह बिबट्यांचाही वावर वाढला आहे. आठ दिवसांपासून परिसरातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. यापूर्वीही पाणी व चाऱ्याच्या शोधात असलेल्या अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचे मृत्यू टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

मनारखेड, पारस शेतशिवारात बिबट्याची दहशत कायम

तालुक्यातील मनारखेड, पारस शिवारातील परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे वनविभागाने लावलेल्या सिसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे उघडकीस आले होते. आज अपघातात बिबट्याचा मृत्यू झाला असला तरी या परिसरात आढळणारा बिबट्या हाच आहे. याची पुष्टी वनविभागाकडून अद्याप झाली नसल्याने या परिसरात बिबट्याची भीती कायम आहे.

"मनारखेड परीसरात आढळणारा बिबट व अपघातात ठार झालेला बिबट एकच आहे. हे निश्चित सांगता येणार नाही. कारण मनारखेड परीसरातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही बिबट वेगवेगळे आहेत. कारण हा वनविभागाचा परीसर नसल्याने निश्चित सांगता येत नाही. जंगलात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजची तपासणी करण्यात येणार आहे. 

-राजेंद्र कातखेडे प्रादेशिक वन अधिकारी अकोला

Web Title: Leopards killed on road accident