धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : धावत्या दुचाकीवर बिबट्याने हल्ला केला. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना तालुक्‍यातील बरडकिन्ही- चिचगाव महामार्गावर रात्रीच्या सुमारास घडली. तसेच त्याच रात्री गावात बिबट्याने प्रवेश करून गोठ्यातील शेळी फस्त केली. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सविता शांताराम धोटे (वय 36) असे जखमी महिलेचे नाव आहे.

हिंगणघाट तालुक्‍यातील कुंबी येथील सविता धोटे चिमूर येथील राहुल शेरकी यांच्याकडे आल्या होत्या. त्या दुचाकीने वांद्रा आक्‍सापूर येथील रवींद्र भोयर यांच्याकडे जाण्यासाठी निघाल्या. रात्रीची वेळ असल्याने सर्वत्र अंधार होता. बरडकिन्ही-चिचगाव रस्त्यावर झुडपात दबा धरून असलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र, सुदैवाने या हल्ल्यातून त्या बचावल्या. त्याच रात्री बरडकिन्ही येथील दिलीप पांडुरंग दोनाडकर यांच्या घरात शिरून बिबट्याने शेळीला ठार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lepord attack on a running bike