बृहतआराखड्यावर "फिडबॅक' द्या हो..! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे चार वर्षांनंतर बृहतआराखडा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालकांसह नेत्यांकडून "फिडबॅक' मागविण्यात आला आहे. मात्र, दोनदा तारखांमध्ये वाढ केल्यानंतरही सर्व स्तरातून निरुत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत केवळ 2 हजार 400 लोकांनीच विद्यापीठाला "फिडबॅक' दिल्याची बाब समोर आली आहे. 

विद्यापीठात नेमकी किती नवी महाविद्यालये द्यावी, कोणत्या शाखांमध्ये वाढीव जागांची मागणी आहे, कोणत्या क्षेत्रात कोणत्या अभ्यासक्रमांचे महाविद्यालय द्यावे यासह इतर बाबींचा आराखड्यात समावेश करायचा आहे. त्यासाठी नेमके काय करावे यासाठी विद्यापीठाद्वारे पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, शासकीय कर्मचारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, अधिसभा सदस्य, शासकीय अधिकारी, संस्थाचालकांसह नेत्यांकडून "फिडबॅक' मागविण्यात आला होता. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 3 मे पासून प्रत्येक वर्गासाठी अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. 10 मे पर्यत बृहत आराखडाबद्दल "फिडबॅक' द्यायचा होता. मात्र, तोपर्यत केवळ चारशे ते पाचशे नागरिकांनी "फिडबॅक' दिल्याने 20 तारखेपर्यत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अद्याप 2 हजार 400 नागरिकांनी फिडबॅक दिला आहे. 

राज्यासाठी एक आराखडा 
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह इतर सर्वच विद्यापीठांकडून बृहत आराखडा मागविण्यात येणार आहे. सर्व विद्यापीठांच्या बृहत आराखड्यावरुन संपूर्ण राज्याचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यावर विद्यापीठाकडून त्यावर फिडबॅक येणे बरेच गरजेचे आहे. 

विद्यापीठाच्या बृहत आराखड्यावर सर्वच स्तरातून "फिडबॅक' मिळावा यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही बराच कमी "फिडबॅक' आल्याचे दिसते. 
-डॉ. विनायक देशपांडे, अधिष्ठाता, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखा. 

नागपूर विद्यापीठातील स्थिती 
विद्यार्थी संख्या - 2,50,000 
प्राध्यापक - 4,000 
महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी - 2,500 
संस्था- 450 
प्राचार्य - 200 
विद्यापीठातील प्राध्यापक - 125 
विद्यापीठ अधिकारी - 36 
विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी - 667

Web Title: Let's give Feedback

टॅग्स