चला खाण पर्यटनाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नागपूर :  महानायक अमिताभ बच्चन यांचा काला पत्थर चित्रपट पाहिला का? नसेल पाहिला तर खाणीत काम करणाऱ्यांचे छायाचित्र तरी पाहिलेच असेल. ते पाहिल्यानंतर तेथील जोखमीच्या वातावरणाविषयी जाणून घेण्याची इच्छा होत असेल तर ती संधी आता जिल्ह्यातील सावनेर येथील खाणीत सर्वसामान्यांना मिळणार आहे. 

नागपूर :  महानायक अमिताभ बच्चन यांचा काला पत्थर चित्रपट पाहिला का? नसेल पाहिला तर खाणीत काम करणाऱ्यांचे छायाचित्र तरी पाहिलेच असेल. ते पाहिल्यानंतर तेथील जोखमीच्या वातावरणाविषयी जाणून घेण्याची इच्छा होत असेल तर ती संधी आता जिल्ह्यातील सावनेर येथील खाणीत सर्वसामान्यांना मिळणार आहे. 
वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने खाण पर्यटनाचा देशातील पहिला प्रयोग सुरू झाला आहे. त्याचा आनंद अनेकांनी लुटला असून, देशभरातील पर्यटक येथे येत आहेत. त्यासाठी तब्बल सहा एकरात "माइन टूरिझम सर्किट' साकारले आहे. एमटीडीसी या खाण पर्यटनाचे संचालन करीत आहे. इको पार्कमध्ये घनदाट झाडे असून, त्यात दीड एकरात हिरवळ आहे. देशी झाडांचे व फुलांचे शेकडो प्रकार येथे बघायला मिळतील. सावनेर येथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेडने भूमिगत खाणीचे मॉडेल तयार केले आहे. यात शिरताच तुम्हाला खाणीतील अनुभव घेता येतो अन्‌ तेथील कार्याची माहिती मिळते. खाण पर्यटन सहलही येथे सुरू झाली आहे. त्यासाठी प्रशिक्षित गाइडची सोय केली आहे. याला विदर्भातूनच नव्हे तर देशभरातील पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. 
"खाण पर्यटन' योजना उपलब्ध झाल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह पर्यटनप्रेमी, नागरिक भूगर्भातील रचना प्रत्यक्ष अनुभवत आहेत. खाणीच्या आतील संरचना कशी असते, कोळशाचे उत्खनन कसे होते, खाणीतील पाण्याचे झरे, कामाचे नियोजन कसे असते, खाणीत ब्लास्टिंग कशा पद्धतीने होते याचा अनुभव प्रत्यक्ष खाणीत जाऊन घेण्याची संधी आता पर्यटकांसह अभ्यासकांना उपलब्ध झाली आहे. 
कशी आहे सहल? 
खाण क्षेत्राची सहल नागपुरातील एमटीडीसीच्या कार्यालयातून सुरू होते. तेथून "आदासा गणपती मंदिर' वेस्टर्न कोलफिल्डद्वारे विकसित केलेले "निसर्ग पार्क' सावनेर येथील भूमिगत कोळसा खाणीत नेण्यात येते. यातून विदर्भात येणाऱ्या पर्यटकाना आता वन, धार्मिक आणि आता खाण पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's go mining