Video : चला भिवकुंड... निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात साठवू

नीलेश झाडे
Thursday, 16 January 2020

गोंडपिपरी तालुक्‍यातील घनदाट जंगलाच्या कुशीत भिवकुंड देवस्थान विसावले आहे. चहूबाजूंनी वनराई असलेल्या भिवकुंड देवस्थानाशी अनेकांची श्रद्धा जुळलेली आहे. सध्या भाविक मोठ्या संख्येने भिवकुंडला भेट देत आहेत. येथे आंघोळ केल्यास रोग दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. मात्र, भिवकुंडला जाण्यासाठी पक्का मार्ग नाही. घनदाट जंगलातून पायवाटेने भिवकुंड गाठावे लागते.

धाबा (जि. चंद्रपूर) : विदर्भात अनेक पर्यटन स्थळ आहेत. यामुळे पर्यटकांचा लोढा नेहमी विदर्भाकडे येत असतो. पछमडी, चिखलधरा आदी विशेष आहेत. येथील निसर्गरम्य वातावरण आणि इतिहास बघण्यासाठी पर्यटकांची नेहमी गर्दी होत असते. चिखलधरा येथे भिमकुंड आहे. असे म्हणतात भीममाने राक्षसाचा वध केल्यानंतर इथे हात धुतले आणि हा कुंड तयार झाला! असेच एक जुन स्थळ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी तालुका. धाबा परिसरात असलेल्या कुडेनांदगावापासून साधारणता सहा कि. मी. अंतरावर भिवकुंड हे स्थळ आहे. दोन डोंगरांच्या मध्यभागी असलेली खोल दरी... दगडी सात कुंड... सभोवताल हिरवीकंच वनराई... निसर्गाने मुक्तपणे सौंदर्याची उधळन केलेले ठिकाण म्हणजे भिवकुंड. गोंडपिपरी तालुक्‍यात असलेल्या भिवकुंड देवस्थानाकडे भक्तांचा रांगा लागल्या आहेत. काही श्रद्धेने तर काही निसर्गाचे देखणे रूप डोळ्यात साठविण्यासाठी भिवकुंडाला भेट देतात.

क्लिक करा - घरी कोणीही नसल्याचे पाहून तो आला दहा मिनिट अंगणात चर्चा केली आणि...

गोंडपिपरी तालुक्‍यातील घनदाट जंगलाच्या कुशीत भिवकुंड देवस्थान विसावले आहे. चहूबाजूंनी वनराई असलेल्या भिवकुंड देवस्थानाशी अनेकांची श्रद्धा जुळलेली आहे. सध्या भाविक मोठ्या संख्येने भिवकुंडला भेट देत आहेत. धाबा परिसरात असलेल्या कुडेनांदगावापासून साधारणता सहा कि.मी. अंतरावर असलेले भिवकुंड स्थळ आहे. भिवकुंडला जाण्यासाठी पक्का मार्ग नाही. घनदाट जंगलातून पायवाटेने भिवकुंड गाठावे लागते.

हेही वाचा - नागपुरात घडले "छपाक', "लेबॉरेटरी असिस्टंट'ने...

बैलबंडीने दूरवरून भाविक येथे नवस फेडाण्यासाठी येतात. दोन डोंगराचा मध्यभागी खोल दरी आहे. या दरीतून पाण्याचा ओढा वाहत असतो. पाण्याचा या प्रवाहात नैसर्गिक सात दगडी कुंड आहेत. या कुडांतील पाण्याने आंघोळ केल्यास रोग दूर होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. दरीचा दोन्ही बाजूंनी उंच उंच असलेल्या डोंगरावर वनराईची हिरवीकंच चादर पसरली आहे. निसर्गाचा हा सुंदर देखावा डोळ्यात साठण्यासाठी भिवकुंडावर भाविक गर्दी करीत आहेत.

Image may contain: people sitting, outdoor, nature and water

पर्यटन स्थळ घोषित करा

हिवाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूत भक्तांचा ओढा भिवकुंडाकडे जात असतो. अनेकांची श्रद्धा भिवकुंड देवस्थानाशी जुळली आहे. अनेक वर्षांपासून भिवकुंड स्थळाला पर्यटन स्थळ घोषित करा, अशी मागणी भाविक करीत आहेत. मात्र, भाविकांचा मागणीकडे प्रशाशनाचे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let's look at Bhivkund in Chandrapur district