अकोला - गांधीग्रामच्या पुलाचे आयुष्य संपले! 

gandhigram
gandhigram

अकोला (गांधीग्राम) : येथून वाहणाऱ्या पुर्णा नदीच्या पुलाला बांधून आज ९१ वर्ष पुर्ण झाले आहेत. इ.स. १९ जुलै १९२७ रोजी या पुलाे उद्घाटन करण्यात अाले होते. ९१ वर्षाचा झालेला हा पुल १०० वर्ष टिकणार असे जरी बोलले जात असले तरी या पुलाचे अायुष्य संपले अाहे. या ठिकाणी नवीन पूल त्वरीत बांधण्यात यावा अशी अोरड वाहनधारक करीत अाहेत. कारण सावित्री नदीवरील पुलासारखी घटना भविष्यात होऊ नये एेवढीच अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. 

महामार्गावरील अकोला-अकोट रोडवर असलेल्या गांधीग्रामच्या पुलाला आज (ता.१९) ९१ वर्ष पूर्ण झाले आहेत. अकोल्याहून १७ किलो मीटरवर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरील या पुलाचे उदघाटन इ.स.१९ जुलै १९२७ रोजी ब्रिटिश अधिकारी मोन्टेग्यू बटलर यांच्या हस्ते करण्यात आले होते. हा मार्ग अती रहदारीचा असल्याने येथे आतापर्यंत नवीन पुल होणे आवश्यक होते. मात्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नवीन पुल अजून झाला नाही. 

हा पूल ब्रिटिशांनी बांधल्यामुळे तो त्याची मर्यादा संपल्यावरही तग धरून आहे. सद्या जर असा पुल बांधला असता तर तो काही वर्षांत पडला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये अाहे. या पुलावरुन ९१ वर्षात २५० ते ३०० पुर गेले असल्याचे येथील जाणकार सांगतात. 

अशी अाहे पुलाची रचना 
या पुलाची उंची ३५ फूट व रुंदी २० फूट आहे. लांबी २५५ फूट असून या पुलाला आठ गाळे आहेत. एक गाळा वीस फुटावर आहे. नदीच्या काठावर दोन्ही बाजूला पुलाच्या सुरक्षेसाठी कवच (पिचिंग) बसविलेले आहे. पूल मजबूत होण्यासाठी नदीवर खोलवर सिमेंट लोखंडचा वापर करून बांधलेला आहे. 

गोपालखेडवरून होणार नवीन पुल 
नवीन पुलाचे काम या पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपालखेड येथे सुरू आहे. मात्र रस्त्याचे काम आजून सुरू झाले नाही. या कामाला गती मिळावी व नविन पुल लवकर सुरू व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. 

गांधीग्राम येथील पुलाची पाहणी केली आहे. हा पुल मजबूत स्थितीत असून पूर्ण १०० वर्ष टिकणार आहे. मात्र याला जे आठ गाढे आहेत त्यापैकी चार गाढ्यामध्ये मातीचा भराव पडलेला आहे. बाकीच्या चारच गाढ्यामधून पाणी वाहते. हे सर्व गाढे साफ केल्यास व पुलाजवळ डागडुजी केल्यास या पुलाची वयोमर्यादा वाढणार आहे. यासाठी वरिष्ठांना कळविले आहे. 
-निखिलेश चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com