जीवघेण्या हल्ल्यातील जखमींची ओळख पटली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीतील आयसी चौक परिसरात शुक्रवारी (ता. 11) रस्त्याने जाणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणावर काही अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. त्या जखमीची ओळख पटली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर):  एमआयडीसीतील आयसी चौक परिसरात शुक्रवारी (ता. 11) रस्त्याने जाणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणावर काही अज्ञात आरोपींनी दगडाने डोक्‍यावर वार करून गंभीर जखमी केले. त्या जखमीची ओळख पटली असून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
रामरतन बैरागी देवेश्वर (भीमनगर, इसासनी) असे जखमीचे नाव असून लता मंगेशकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तो अद्याप पूर्णपणे शुध्दीवर आला नाही. याप्रकरणी या परिसरात राहणाऱ्या दोन विधिसंघर्ष बालकांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता जखमी हा आयसी चौकमधील दारूभट्टीसमोर असलेल्या शेंगदाणे विकणाऱ्या ठेल्यावर उभा होता. दरम्यान, दोन्हीही विधिसंघर्ष बालके आपापसात भांडण करीत असताना रामरतनने त्यांना हटकले. यावरून बाचाबाची होऊन अखेर या दोघांनी दगडाने त्याच्यावर हल्ला केला, असे सांगितले. त्यानंतर घटनास्थळवरून ते फरार झाले. ठाणेदार प्रदीप रायनावर यांनी त्या शेंगदाणे विक्रेत्यालासुद्धा विचारले. जखमी पूर्णपणे शुद्धीवर न आल्यामुळे त्याचा जबाब नोंदविण्यात आला नाही. एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळला 
बुटीबोरी ः रेल्वे रुळावरील प्लॅस्टिक कचरा उचलणाऱ्या व्यक्तीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह 
आढळल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.45 च्या दरम्यान बुटीबोरी पोलिस हद्दीतील सोनुर्ली शिवारात घडली. 
घटना बुटीबोरी हद्दीतील असून फिर्यादी बुटीबोरी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक केशव पितांबर प्रमाणिक यांना रेल्वे रुळावरील प्लॅस्टिक कचरा गोळा करणाऱ्या व्यक्तीने बुटीबोरी ते बोरखेडी या दरम्यान एक अज्ञात स्त्रीचा मृतदेह पडून असल्याची माहिती दिली. फिर्यादीने याची सूचना स्थानिक पोलिस  ठाण्यात दिली असता बुटीबोरी पोलिस ठाण्यातील हवालदार अनिल व्यवहारे आणि विवेक गेडाम यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेचे वय 20 ते 25 वयोगटातील असून वर्ण निमगोरा, उंची 5 फूट 2 इंच, अंगावर खाकी रंगाचा गाऊन, लाल पांढऱ्या रंगाचे ब्लाउज असे वर्णन आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. नागपूर येथील मोक्षधाम या ठिकाणी दफनविधी करण्यात आला. घटनेची नोंद करून पुढील तपास बुटीबोरी पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life-threatening injuries were identified