जिवावर आले ते बोटावर निभावले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

नागपूर - थांबलेल्या रेल्वेगाडीखालून जाणे दारुड्याला चांगलेच महागात पडले. अचानक रेल्वेगाडी पुढे सरकल्याने डाव्या हाताची चार बोटे कापली गेली आणि अंगठाही चेंदामेंदा झाला. "जिवावर आले ते बोटावर निभावले' या उक्तीची प्रचिती घटनेच्या निमित्ताने आली.

नागपूर - थांबलेल्या रेल्वेगाडीखालून जाणे दारुड्याला चांगलेच महागात पडले. अचानक रेल्वेगाडी पुढे सरकल्याने डाव्या हाताची चार बोटे कापली गेली आणि अंगठाही चेंदामेंदा झाला. "जिवावर आले ते बोटावर निभावले' या उक्तीची प्रचिती घटनेच्या निमित्ताने आली.

सुशीलकुमार माहानंदा (40) असे बोटे गमावणाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा ओडिशा येथील रहिवासी असून, मिस्त्रीकाम करतो. कामानिमित्त तो मानकापूर झोपडपट्टीत राहतो. दारू पिऊन तो घरी परत येत होता. त्याचवेळी नागपूर स्थानकाकडे येणारी दक्षिण एक्‍स्प्रेस मानकापूर परिसरात उभी होती. डोक्‍यात दारू भिनलेल्या सुशीलकुमारने गाडीखालून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. रुळावर हात ठेवला आणि त्याचवेळी गाडी पुढे सरकली. काही फूट पुढे सरकल्यानंतर गाडी पुन्हा थांबली आणि तो बचावला.

लागलीच काहीजण त्याच्या मदतीला धावले आणि दक्षिण एक्‍स्प्रेसच्या एसएलआर डब्यात टाकले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला घटनेची माहिती दिली. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लोहमार्ग ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल राजेंद्रप्रसाद डाकरे रुग्णवाहिकेसोबत उपस्थित होते. गाडी येताच रुग्णवाहिकेतून त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस बोटांसह मेयोत
माहिती मिळताच जरीपटका ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमीला नागपूर स्थानकावर पाठविल्याची माहिती त्यांना मिळली. अपघातस्थळी बोटे तशीच पडून असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चारही बोटे घेऊन पोलिस मेयो रुग्णालयात पोहोचले.

Web Title: Life was played on the finger