आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांचा संप सुरू

वाडी/सोनेगाव :आयुधनिर्माणी अंबाझरी येथील कर्मचाऱ्यांचा बंद.
वाडी/सोनेगाव :आयुधनिर्माणी अंबाझरी येथील कर्मचाऱ्यांचा बंद.

वाडी/सोनेगाव (जि.नागपूर) : आयुधनिर्माणी अंबाझरीसह देशातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यातील कर्मचाऱ्यांचा आजपासून संप सुरू झाला. आयुधनिर्माणी कारखान्याचे खासगीकरण व महामंडळ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्याचा विरोध करण्यासाठी देशभरातील आयुधनिर्माणी कारखान्यातील कामगार संघटना एकवटल्या आहेत. देशातील सर्व आयुध कारखान्यांचा सरकारी दर्जा कायम राहावा ही मागणी कर्मचारी करीत आहेत.
   आयुधनिर्माणी अंबाझरी येथील कर्मचाऱ्यांचा बंद पहिल्याच दिवशी शंभर टक्के यशस्वी झाला. संप प्रस्तावित असल्याने आयुधनिर्माणी प्रशासनाने पोलिस, राज्य राखीव पोलिस दल, डिफेन्स सुरक्षा बलच्या जवान तैनात केले होते. दत्तवाडी येथील असलेले डिफेन्स प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. अंबाझरी आयुधनिर्माणचीच्या आठवा मैल प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र झाले. आयुधनिर्माणी कर्मचाऱ्यांच्या रेड युनियन, इंटक, लोकशाही कामगार फेडरेशन यासोबत भारतीय मजदूर संघ ही संघटनादेखील भगवा झेंडा घेऊन सरकारच्या विरोधात नारे लावून संताप व्यक्त केला. आयुधनिर्माणीतील सुरक्षारक्षकदेखील काळ्या फिती लावून ड्यूटी बजावत आहेत तर अत्यावश्‍यक सेवेतील रुग्णालय, डॉक्‍टर, परिचारिका, अग्निशमन, सुरक्षा इ.चे कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित दिसून आले. मात्र, त्यांनीही केंद्र शासनाचा हा निर्णय धोकादायक असल्याने पुनर्विचार करावा असे मत नोंदविले.आयुधनिर्माणीच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर चारही कामगार संघटनेचे गिरीश खाडे, बी. बी. मजुमदार, विनोद कुमार, आशीष पाचघरे, दीपक गावंडे, क्षीरसागर, विनोद रामटेके, राकेश खाडे, इंटकचे प्रवीण महल्ले, सुभाष पडोळे, अरविंद सिंह, अंजुम,बीपीएमएसचे आर. पी. चवरे, अध्यक्ष बंडू तिडके, ओ. पी. उपाध्याय, ब्रिजेश सिंह, संजय वानखेडे, अतुल चवरे, लोकशाही कामगार यूनियनचे अध्यक्ष जगदीश गजभिये, वेदप्रकाश सिंह, अविनाश रंगारी, सुदर्शन मेश्राम, सतीश बागडेसह खुर्शीद पठाण, अबनिष मिश्रा, प्रेमसागर आदीच्या नेतृत्वात शेकडो कामगारांनी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून नारे लावत केंद्र सरकारचा धिक्कार करून निगमीकरण व खासगीकरण रद्द करण्याचे जोरदार नारे लावले. आंदोलनस्थळी आज शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे,युवा नेते विशाल मुत्तेमवार यांनी आयुधनिर्माणी अंबाझरी येथे सुरू असलेल्या या आंदोलनाला भेट दिली आणि पाठिंबा जाहीर केला.
एका महिन्यापासून आंदोलन
सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास लाभलेल्या देशभरातील आयुधनिर्माणी कर्मचारी मागील एक महिन्यापासून कुटंबासह आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार हट्ट धरल्याप्रमाणे हा प्रस्ताव मंजूर करण्याच्या विचारात आहे. आयुधनिर्माणीचे कारखान्याचे खासगीकरण थांबविण्यासाठी आता एक लाख कर्मचाऱ्यांनी सरकारला वठणीवर आणण्यासाठी व देशभक्तीचे खोटे नाटक उघडे पाडण्यासाठी तीस दिवसांचा ऐतिहासिक संप पुकारल्याचे कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com