esakal | प्रत्येक तासाला विजेचा लपंडाव!
sakal

बोलून बातमी शोधा

mscb

प्रत्येक तासाला विजेचा लपंडाव!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंदखेडराजा: तालुक्यातील किनगावराजा येथे गेल्या काही दिवसांपासून महावितरणला कंपनीचे काम त्रासदायक ठरत आहे. दर तासाला बत्ती गुल होण्याचा प्रकार वाढल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी अप-डाऊन करत असल्याने गावाकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळते. याकडे महाविरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. किनगाव राजासाठी कायमस्वरूपी व मुख्यालय राहणारे अधिकारी व कर्मचारी देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा: सिंदखेडराजात महाविकास आघाडीचा बोलबाला

एक तासाच्या अंतराने तर कधीकधी पाच-पाच मिनिटांनी वीज पुरवठा खंडित होत असल्याचे याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. वीज खंडित होण्याची कोणतीही ठराविक वेळे नाही. रात्रीबेरात्री तर दिवसा वीज पुरवठा खंडित होत आहे. परिसरात वीज पुरवठा खंडित होणे, विद्युतदाब अचानक कमी- जास्त होणे यासारखे अनेक प्रकार नेहमीच झाले आहे. एखादे वेळी वीज पुरवठा सुरू झाला तर तो पुन्हा कधी खंडित होईल याचा कल्पनाही कुणाला येत नाही. यामुळे विद्युत दाब अचानक कमी जास्त होत असल्याने विजेवर चालणार्‍या उपकरणात बिघाड होत आहे.

गावातील रोहित्र हे नादुरुस्त असून, विद्युत लाइनचे तार सुद्धा जीर्ण झालेले आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. विद्युत तार मोठ्याप्रमाणात खाली आल्यामुळे गांवामध्ये वाहनाला जाण्यासाठी कसरत करावी लागते. गावातील रोहित्राला ग्रहण लागल्यामुळे गावातील विद्युत बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे.याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे गरजेचे

किनगावराजा येथे उपकेंद्र असून या ठिकाणी सहाय्यक अभियंता व कर्मचार्‍यांची यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परंतु, उपकेंद्र असून सुद्धा या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.सर्वसामान्य नागरिकांना समस्या असल्यास त्यांना सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयात जावे लागते व समस्यांचे निराकरण करावे लागते आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयांच्या ठिकाणी राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा: सिंदखेड राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

देखभाल व दुरुस्ती महावितरणची डोकेदुखी

मेंटेनेस व दुरुस्तीचा कंत्राटदार करार पद्धतीने नियुक्त केल्यामुळे तालुक्यातील महावितरणची दयनीय अवस्था झाली आहे. मेंटेनेससाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून दुर्लक्ष झाले आहे. तीन वर्ष मेंटेनेस करार झाल्यामुळे कंत्राटदार महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांचे कोणतेही आदेश जुमानत नाही. महावितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित कंत्राटदाराचा करार रद्द करून नवीन ठेकेदार नियुक्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.

loading image
go to top