वीजतारांच्या संपर्कात येऊन पाचजण भाजले

 वीजतारांच्या संपर्कात येऊन पाचजण भाजले

नागपूर : भर पावसात वरच्या माळ्यावर लोखंडी आलमारी चढविण्याचा प्रयत्न करीत असताना वीजतारांच्या संपर्कात येऊन पाचजण गंभीररीत्या भाजले. शुक्रवारी रात्री टिमकीतील भानखेडा परिसरात ही घटना घडली. जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहम्मद हुसेन मोहम्मद शब्बीर (47), मोहम्मद अनीस मोहम्मद अन्वर (22), मोहम्मद सलीम मोहम्मद अन्वर (33) यांच्यासह शुभम व 42 वर्षीय नौशाद असे पाच जण जखमी झाले. माहितीनुसार भानखेडा परिसरात हुसेन नावाच्या व्यक्तीची इमारत आहे. इमारतीच्या जवळून 11 केव्ही क्षमतेची वीजवाहिनी गेली आहे. घरमालकाने बोलावलेले लोखंडी कपाट शुक्रवारी रात्री घरापुढे पोचले. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. घरमालकाने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावून घेतले. पावसातच त्यांनी कपाट वरच्या माळ्यावर चढविण्याचे प्रयत्न सुरू केले. हातात लोखंडी आलमारी, जवळून जाणारी वीजवाहिनी असा संयोग घडून आला. वीज पडावी तसा अचानक लख्ख प्रकाश झाला आणि कपाट पकडून असलेले पाचही जण भाजले. स्थानिक रहिवाशांनी धावपळ करीत त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसही मेयो रुग्णालयात पोहचले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.हायटेन्शन लाइनखालील धोकादायक घरांच्या निरीक्षणासाठी न्यायालयाने स्थापन केलेल्या कमिटी सदस्यांनीही या भागात भेट दिली होती. संबंधित घरमालकाला धोक्‍याची सूचना देत नोटीससुद्धा बजावण्यात आली असल्याचे सूत्राने सांगितले. एसएनडीएलनेसुद्धा नोव्हेंबर 2017 मध्ये घरमालकाला नोटीस बजावली आहे. अनधिकृतपणे या इमारतीचे बांधकाम समोर वाढविण्यात आल्याने वीजतारा अधिकच जवळ आल्याची माहिती स्थनिकांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com