नवजीवन एक्‍स्प्रेसमधून दारूसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वर्धा : कधी गांजाच्या तस्करीकरिता वापर होत असलेल्या रेल्वेतून आता दारूची अवैध वाहतूक सुरू झाली आहे. नवजीवन एक्‍स्प्रेसमधून वर्धा रेल्वे पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून देशी दारूचा साठा जप्त केला. पोलिसांनी गुरुवारी (ता. नऊ) रात्री केलेल्या कारवाईत देशी दारूच्या 1,465 बाटल्या जप्त केल्या आहेत.
किरण फुलसिंह जाधव (वय 25) आणि राजू सुरेश भाट (22) दोन्ही रा. जळगाव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

नवजीवन एक्‍स्प्रेस रात्री वर्ध्यातून रवाना झाली असता यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. रेल्वे पोलिस निरीक्षक सुरेश कांबळे यांनी वरिष्ठांना सूचना देत कारवाई करण्याची परवानगी घेत रेल्वेत ड्यूटीवर असलेले गजानन आदमने, अनिकेत धांडे, विकास बोरवर, नीलेश मोरे यांना माहिती दिली. त्यांनी हिंगणघाट रेल्वे स्थानकालगत गाडीतील एस.-फोर आणि एस.-सेवन या बोगीत असलेल्या बेवारस स्थितीत असलेल्या बॅगची झडती घेतली असता यात मोठ्या प्रमाणात देशी दारू होती. या बॅगबाबत चौकशी केली असता त्या किरण जाधव आणि राजू भाट या दोघांच्या मालकीच्या होत्या.
चंद्रपुरात जाणार होता दारूसाठा
शासनाने चंद्रपूर जिल्हा दारूबंदी जिल्हा घोषित केला त्या काळापासून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारूसाठ्याची वाहतूक होत आहे. गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईतून जाणारा दारूसाठा जळगाव येथून आल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: liquor saized from navjevan express