चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटीत दारू पकडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

दिघोरी/मोठी (जि. भंडारा) : साकोली येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटी बसमधून दारूतस्करी करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. साकोली आगाराच्या बस(क्र. एमएच 40 वाय 5396) मधून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती दिघोरी पोलिसांनी मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह मार्गावर नाकाबंदी करून बस थांबविली. शेवटच्या सीटवर बसलेल्या दोन महिला व एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे दारू आढळून आली. ज्योती शेषपाल मेश्राम (वय 30, रा.

दिघोरी/मोठी (जि. भंडारा) : साकोली येथून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एसटी बसमधून दारूतस्करी करणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. साकोली आगाराच्या बस(क्र. एमएच 40 वाय 5396) मधून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती दिघोरी पोलिसांनी मिळाली. त्यांनी पोलिस पथकासह मार्गावर नाकाबंदी करून बस थांबविली. शेवटच्या सीटवर बसलेल्या दोन महिला व एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे दारू आढळून आली. ज्योती शेषपाल मेश्राम (वय 30, रा. चंद्रपूर) हिच्या जवळील कापडी पिशवीत 400 नग 90 मिलीग्रॅम देशी दारूच्या सिलबंद बाटल्या; तर माधवी उमेश मेश्राम (31, रा. भिवसनटोला, साकोली) हिच्याकडे 450 नग देशी दारूच्या बाटल्या, निशांत डोंगरे (36, रा. कुंभारेनगर नाना चौक, गोंदिया) याच्याकडे विदेशी दारूच्या 24 बाटल्या असा एकूण 25 हजार 460 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

Web Title: liquor saized from st bus