ऐकावे ते नवलच! वॉट्‌सऍपवर स्टेटस टाकून करवून घेतला सर्पदंश 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

सहा दिवसांपूर्वी धीरजने आपल्या व्हॉट्‌सऍपवर एक स्टेटस टाकले. त्यात उद्याचा दिवस माझ्यासाठी देव ठरवणार आहे. नागापेक्षा 6 पट विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाचा दंश मी स्वतःहून करून घेणार आहे, असे त्यात त्याने लिहिले होते. स्टेटस टाकल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याने मण्यार सापाकडून स्वतःला दंश करवून घेतला.

चंद्रपूर : जिल्ह्यातील एका सर्पमित्राने सोशल मीडियावर प्रथम स्टेटस टाकला आणि त्यानंतर स्वतःला सर्पदंश करवून घेतला. लोकांना आश्‍चर्यात टाकणारा हा प्रकार वरोरा येथे घडला. सर्पदंश केल्यानंतर वेळीच उपचार झाल्यामुळे सर्पमित्राचे प्राण वाचले. धीरज घुमे असे या सर्पमित्राचे नाव आहे. 
तो वरोरा शहरात राहतो. सहा दिवसांपूर्वी धीरजने आपल्या व्हॉट्‌सऍपवर एक स्टेटस टाकले. त्यात उद्याचा दिवस माझ्यासाठी देव ठरवणार आहे. नागापेक्षा 6 पट विषारी असलेल्या मण्यार जातीच्या सापाचा दंश मी स्वतःहून करून घेणार आहे, असे त्यात त्याने लिहिले होते. स्टेटस टाकल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्याने मण्यार सापाकडून स्वतःला दंश करवून घेतला. हा वेडेपणा त्याच्या घरच्यांच्या लक्षात आला. कुटुंबियांनी त्याला ताबडतोब वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वेळीत योग्य उपचार मिळाल्याने धीरजचे प्राण वाचले. दोन दिवसांपूर्वीच त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. 
त्याने हा प्रकार का केला असावा याचे कारण गुलदस्त्यात आहे. मण्यार हा अतिविषारी साप आहे. तो सर्पमित्र धीरज घुमे याच्याकडे कसा आला? सर्पदंश करवून घेण्यामागे त्याचा उद्देश काय होता याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Listen to it! Snakebite is done by putting status on WhatsApp