एलआयटीच्या स्वायत्ततेसाठी प्रयत्न करणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नागपूर - लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एलआयटी)सोबत जुने ऋणानुबंध आहेत. संस्थेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. देशातील नामवंत संस्थांच्या रांगेत आणण्यासाठी एलआयटीला स्वायत्त करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (एलआयटी) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे चिटणवीस सेंटर येथे आयोजित संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष कमल सिथा होते. प्रमुख पाहुणे म्हणून एलआयटीचे संचालक डॉ. राजू मानकर, अमेरिकेतील उद्योगपती सारंग हरदास, ओसीडब्ल्यूचे व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, एलआयटीमध्ये माझे बरेच मित्र आहेत. त्यामुळे एलआयटीसोबतचा माझा संबंध जवळचा आहे. एलआयटीमध्ये प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. आता एलआयटीला विद्यापीठातून वेगळे करणे गरजेचे आहे. मात्र, याचा अर्थ विद्यापीठ वाईट आहे, असा होत नसून त्यांच्याकडे असलेला महाविद्यालयांच्या मोठ्या संख्येमुळे कदाचित एलआयटीकडे दुर्लक्ष झाले. शासन संस्थेच्या स्वायत्ततेसाठी निश्‍चित प्रयत्न करेल. मात्र, सर्व भार शासनावर टाकता येणार नाही. माजी विद्यार्थ्यांची संघटना आणि शासनाच्या सहकार्यानेच ते शक्‍य होईल. एलआयटीला देशातील नामवंत संस्थांमध्ये आणण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करणार. या वेळी कमल सिथा यांनी प्रास्ताविकात संमेलनाविषयी माहिती दिली. कार्यक्रमात देशविदेशातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

Web Title: LIT meeting of former students