आई स्वयंपाकघरात नव्हे तर संगणकावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

नागपूर - यंदा बालभारतीनेही पहिली ते दहावीच्या पुस्तकांमध्ये काळाशी सुसंगत आकर्षक बदल केले आहेत. सर्व पुस्तके कलरफुल असून त्यात जुन्या पुस्तकांप्रमाणे आई स्वयंपाकघरात काम करताना नव्हे तर कॉम्प्युटरवर ऑनलाइन खरेदी करताना दाखविण्यात आली आहे. 

नागपूर - यंदा बालभारतीनेही पहिली ते दहावीच्या पुस्तकांमध्ये काळाशी सुसंगत आकर्षक बदल केले आहेत. सर्व पुस्तके कलरफुल असून त्यात जुन्या पुस्तकांप्रमाणे आई स्वयंपाकघरात काम करताना नव्हे तर कॉम्प्युटरवर ऑनलाइन खरेदी करताना दाखविण्यात आली आहे. 

इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीच्या अभ्यासक्रम व त्यानुसार पुस्तके आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेचा वापर केला  आहे. भूतकाळातील गोष्ट समजवून सांगण्यासाठी वर्तमान काळातील उदाहरणे दिली आहेत. टेक्‍नॉलॉजी, इंटरनेट आदींचा वापर पुस्तकांमध्ये केला असून ती सर्व एफोर आकारात आहेत. त्याची मांडणीही आकर्षक असल्याने अभ्यासात विद्यार्थ्यांची रुची वाढवणारी आहे. सर्व पुस्तके अधिक आकर्षक, कलरफुल करण्यात आली आहेत. किमती आधीच्या पुस्तकांच्या तुलनेने वाढल्या आहेत. मात्र, नव्या पुस्तकात अनेक चांगले बदलही झाले आहेत. 

पुस्तकावर कॉपीराइट 
दहावीच्या नव्याने आलेल्या प्रत्येक पुस्तकात बालभारतीकडून कॉपीराइटचा उल्लेख करण्यात आला आहे. परवानगीशिवाय कोणालाही त्यांचा मजकूर अन्य ठिकाणी छापता येणार नसल्याचेही बालभारतीने म्हटले आहे. याशिवाय नवीन पुस्तकांच्या पृष्ठांवर बालकांच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या चाइल्डलाइनचा हेल्पलाइन क्रमांकही छापण्यात आला आहे. 

शेअर मार्केटची तोंडओळख
गणिताच्या पुस्तकात नव्याने लागू केलेल्या जीएसटीची माहिती देण्यात आली आहे. त्याबरोबरच शेअर्स, डिबेंचर्स, डिमॅट अकाउंट काय असते, म्युच्युअल फंड, ब्रोकरेज, विमा अशा सर्व संकल्पनांची तोंड ओळख करून देण्यात आली आहे. राज्यशास्त्राच्या पुस्तकात सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक्षण राजकीय पक्षांची थोडक्‍यात माहिती आहे. इंग्रजीच्या पुस्तकात स्टिफन हॉकिंग व कैलास सत्यर्थी यांच्या धड्यांचाही समावेश आहे. भुगोलाच्या पुस्तकात ब्राझीलची भारताशी तुलना करून, तौलनिक अभ्यास कसा करायचा याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

नवीन पुस्तकांची वैशिष्ट्ये 
 दहावीच्या सर्व पुस्तकांत क्‍यू आर कोड 
 भरपूर रंगीत छायाचित्रांचा वापर 
 इंटरनेटवरील संदर्भ देऊन स्पष्टीकरण
 प्रत्येक संकल्पना वर्तमान काळाशी सुसंगत 
 विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेला चालना 

Web Title: literate mother computer education