'साहित्यिकांनी मानधनाचा त्याग करावा'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - 'पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरी पांडुरंगाला मानधन किंवा प्रवास भत्ता मागत नाहीत. त्यामुळे स्वतःला साहित्य पंढरीचे वारकरी समजणाऱ्या साहित्यिकांनी संमेलनाला येण्याचा प्रवास भत्ता आणि मानधन तरी का म्हणून स्विकारावे?' असा सवाल करीत "साहित्यिकांनी या मानधनाचा त्याग करायला हवा,' अशी अपेक्षाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज (गुरूवार) व्यक्त केली.

नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या रुपरेषेसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. "संमेलनांमधील सत्रांमध्ये निमंत्रित केले जाणारे साहित्यिक भाजीवाले किंवा रिक्षाचालक नसतात. ते बहुतांशी प्राध्यापकच असतात. त्यामुळे त्यांचे वेतनही दणकट असते. एक ते दीड लाख रुपयांपर्यंत वेतन घेणाऱ्या साहित्यिकांना प्रवास भत्ता किंवा मानधन नाकारल्याने काहीच फरक पडणार नाही. ते साहित्याचे सेवक असतात. सेवकाने कुठल्याही फळाची अपेक्षा न करता सेवा करायची असते,' असेही डॉ. जोशी म्हणतात. मुख्य म्हणजे महामंडळाच्या अध्यक्षांनी यापूर्वीही अनेकवेळा याचा उल्लेख केला आहे आणि अलीकडे काही कार्यक्रमांमधून देखील ते या मुद्यावर जोर देऊ लागले आहेत. परंतु, आज (गुरूवार) डोंबिवलीतील संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे यांच्यापुढे त्यांनी पत्रकारांच्या माध्यमातून आवाहन केले. त्यामुळे "मानधन देण्याची आपली तयारी आहे काय?' असा प्रश्‍न पत्रकारांनी स्वागताध्यक्षांना विचारला. त्यावर "माझी संपूर्ण तयारी आहे', असे गुलाबराव वझे म्हणाले.

त्यानंतर "साहित्यिकांनी मानधन स्विकारू नये, ही माझी केवळ अपेक्षा आहे. तसे लादण्याचा मला अधिकार नाही. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हे माझे असून महामंडळातील सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना ते मान्य असेलच असे नाही,' असेही स्पष्ट केले. विशेष म्हणजे डोंबिवलीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांना निमंत्रणाची पत्रं जात असताना, अध्यक्षांनी "प्राध्यापक साहित्यिकांना' धडकी भरविण्याचेच काम केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Web Title: Litterateur should reject honorarium