‘लिव्ह इन पार्टनर’ निघाला विवाहित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नागपूर - अविवाहित असल्याचे सांगून चार वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने अश्‍लील मॅसेज आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्रियकर व त्याची पहिली पत्नी या दोघांवर गुन्हे दाखल केले. 

नागपूर - अविवाहित असल्याचे सांगून चार वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या प्रियकराने अश्‍लील मॅसेज आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून विनयभंग केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी प्रियकर व त्याची पहिली पत्नी या दोघांवर गुन्हे दाखल केले. 

पीडित २६ वर्षीय मितांक्षा (बदललेले नाव) जरीपटक्‍यात राहते. चार वर्षांपूर्वी तिची ओळख साजन राजेश ब्राह्मणकर (सिरसपेठ) याच्याशी झाली. दोघांची मैत्री झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. साजनने स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. साडेतीन वर्षांपासून साजनसोबत ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. १६ सप्टेंबर २०१८ मध्ये मितांशाने लग्नासाठी विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत होता. लग्नाचा विषय काढताच तो अश्‍लील बोलून मारहाण करीत होता. शेवटी मितांक्षाने त्याला रजिस्टर मॅरेज करण्याची गळ घातली. तेव्हापासून तो घरातून निघून गेला. काही दिवसांतच प्रिया साजन ब्राह्मणकर या महिलेची फेसबुकवरून फ्रेंड रिक्‍वेस्ट मितांक्षाला आली. तिने ती स्वीकारून प्रोफाईल तपासले असता साजन विवाहित असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने साजनला फोन करून विचारणा केली. साजनने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघाही पती-पत्नीने फेसबुक आणि वॉट्‌सॲपवरून मितांक्षाचे फोटो आणि अश्‍लील मॅसेज व्हायरल करीत बदनामी केली. याप्रकरणी मितांक्षाच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Web Title: live in partner to married