गंभीर! ठाणेदारावर दारूविक्रेत्यांचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : दारू पकडण्यासाठी गेलेल्या ठाणेदार व पोलिसांवर दारूविक्रेत्यांनी अचानकपणे कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ठाणेदार गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ही घटना बल्लारपूर तालुक्‍यातील कोठारीजवळील कवडजी गावालगत सोमवारी (ता. 26) सायंकाळी घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीनंतरही मोठ्या प्रमाणात दारू उपलब्ध आहे. पोलिस कार्यवाहीत दारू जप्त केली जात आहे. बल्लारपूर तालुक्‍यातील कोठारी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवडजी गावालगत जंगलात गावठी दारू काढली जात असल्याची माहिती ठाणोदार संतोष अंबिके यांना मिळाली. लगेच ते आपल्या चमूसह याठिकाणी पोहोचले.

यावेळी पोलिस व दारूविक्रेत्यांत चांगलीच चकमक झाली. यादरम्यान दारूविक्रेत्यांनी ठाणेदारावर कुऱ्हाडीने वार केले. यात ठाणेदार संतोष अंबिके गंभीर जखमी झाले. अंबिकेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. यापूर्वी दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात नागभीडचे ठाणेदार चिडे यांना चिरडून टाकण्यात आले होते; तर खांबाड्यात एका पोलिस शिपायालाही आपले प्राण गमवावे लागले होते. सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर पोलिस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या अंबिके चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ठाणेदार अंबिके हे कालपासून आयसीयूमध्ये भरती आहेत. दारूविक्रेत्यांच्या हल्ल्यात पोलिस शिपाईही जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी विशाल पोरते व विश्वास या दोघांवर गुन्हे दाखल केले. दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत.
- शेखर देशमुख,
सहायक पोलिस अधीक्षक, चंद्रपूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local alcohol vendors attack on police