मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांना केले स्थानबद्ध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. 6) अकोला दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमिवर मंगळवारी सकाळी 11 वाजताच, येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णाभाऊ अंधारे व मनोज तायडे यांना त्यांच्या घरुन पोलिसांनी ताब्यात घेतले व रामदासपेठ पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. 

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता. 6) अकोला दौऱ्यावर येत असून, या पार्श्वभूमिवर मंगळवारी सकाळी 11 वाजताच, येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णाभाऊ अंधारे व मनोज तायडे यांना त्यांच्या घरुन पोलिसांनी ताब्यात घेतले व रामदासपेठ पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. 

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री मंगळवारी अकोल्यात येणार असून, विविध ठिकाणी जाहीर सभाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यांचे दौऱ्याच्या एक दिवसांपूर्वीच म्हणजे सोमवारी (ता. 5) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने बाळापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेसंदर्भात व शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचे नियोजन करीत असताना, रामदासपेठ पोलिसांनी शेतकरी जागर मंचचे समन्वयक कृष्णाभाऊ अंधारे व मनोज तायडे यांना त्याच्या घरातून सकाळी 11 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यामध्ये कलम 149 अन्वये नोटीस देऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. ही प्रक्रिया नियमित असून कुठलाही धाक दडपण व जोरजबरदस्ती केली जात नाही. 
- मुकुंद ठाकरे, पोलिस निरीक्षक रामदास पेठ, अकोला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: local leaders localized by police for CM Visit in Akola