लॉकडाउन: हातावर पोट असलेल्या मजुरांचे हाल

Lock Down: Poor working conditions at Akola
Lock Down: Poor working conditions at Akola

अकोला  : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केला आहे. पुढचे तब्बल २१ दिवस हा लॉकडाउन सुरू असेल. परंतु, या दरम्यान हातावर पोट असणाऱ्या आणि बेघर नागरिकांसोर अडचणींचा डोंगर उभा झाला आहे. गत आठवडाभर हाताला काम नसल्याने घरातील आहे ते राशनपाणी संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुढेचे २० दिवस कुटुंबाला जगवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


बुधवारी अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाने मुलाबाळांसहीत आणि आपल्या तुटपुंज्या संसार-साहित्यासहीत अनेक मजूर कामाच्या शोधात फिरताना दिसे तर काही पायीच चालत घराकडे निघालेले. लॉकडाऊननंतर मालकानी काम बंद करून आपल्या घरी परत जाण्यास सांगितलं. सार्वजनिक वाहतूकही बंद आहेत, त्यामुळे पायीच गावी परतण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नसल्याचे या मजुरांनी सांगितले. कोणताही ठावठिकाणा नसलेल्या या मजुरांना काम बंद झाल्यानं दोन वेळचे जेवणं आणि पाणीही मिळवणं कठीण झालंय. लॉकडाउनमुळे शहरातील  सगळे हॉटेल बंद झालेले आहेत. वाहतूक बंद असल्याने बाजार समितीमध्ये मालाच्या गाड्या येत नसल्याने हमालांना काम मिळत नाही. शहरातील धान्याची दुकाने वगळता इतर बाजारपेठ बंद असल्याने हातगाडीने माल वाहून नेणारे आणि रोजाने काम करणाऱ्याच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रोज गमावन खाणाऱ्यांना आता काय खावे, या प्रश्न पडला आहे.

अनेक संस्थांचा पुढाकार
गरजूंना दोन वेळचे जेवन मिळावे म्हणून काही संस्थांनी पुढाकार घेत रस्त्यावरील नागरिकांना भोजन वाटण्यास सुरुवात केली आहे. यात काही तरूणांचा समावेश आहे. रुग्णांसाठी दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

मुजरांच्या राशनसाठी नगरसेवकांचा पुढाकार
काँग्रेसचे प्रभाग ११ मधील नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांनी त्यांच्या प्रभागातील मजूर कुटुंबांना राशनची गरज असल्यास त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांना प्रभागातील नागरिकांना अशा मजूर कुटुंबाची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

भाजीबाजार, बाजार समिती, धान्य बाजारातील मजुरांचे हाल
शहरातील भाजीबाजारात दररोज लिलाव होतो. त्यावेळी मोठ्याप्रमाणावर येणारा भाजीपाला वाहून नेण्याचे काम हमाल करतात. बाजार समितीतील माथाडी कामगार, धान्य बाजारातील मजुरांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या मजुरांना आता 14 एप्रिलपर्यंत कोणतेही काम मिळणार नाही.

कंपनी लॉकडाऊन तरी मजुरी, रोजंदारी मजुरांचे काय?
सहकार खात्याने तसेत कामगार आयुक्तांनी लॉकडाऊन काळात कामगारांचे वेतन कपात न करता नियमित वेतन देण्याचा आदेश काढला आहे. मात्र रोजंदारीने बाजारपेठेत काम करणाऱ्या मजुरांच्या वेतनाचा प्रश्न कोण सोडविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काम नसल्याने मालकांकडून आणखी किती दिवस त्यांना वेतन दिले जाईल, असाही प्रश्नच आहे. त्यामुळे या मजुरांच्या किमान दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसेचे माजी शहर कार्याध्यक्ष सरफराज खान यांनी सकाळशी बोलताना केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com