लोहारा : परिसरात मेटॅडोअरला झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

लोहारा : परिसरात मेटॅडोअरला झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू

देवरी : तालुक्यातील लोहारा परिसरात मेटॅडोअरला झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.

मोतीनबाई दहारिया (वय ४५) असे मृताचे नाव आहे. एमएच 35- ए. जे. 1832 क्रमांकाच्या मेटॅडोअरने २० मजूर छत्तीसगड राज्यातून आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी येत होते. लोहारा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने आणि सिमेंट रस्त्याला साइड रिफिलिंग नसल्याने मेटॅडोअर उलटला.

हेही वाचा: डोंबिवली : अधिकृत गाळे तर घेतले, पण ग्राहकच नसल्याने विक्रेते नाराज

या अपघातात मोतीनबाई दहारिया यांचा जागीच मृत्यू झाला. तीन जण गंभीर जखमी झाले असून, या जखमींना गोंदियाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालय देवरी व मुल्ला येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top