वर्ध्यात लोकजागर पार्टीची स्थापना

राजेश सोळंकी
मंगळवार, 22 मे 2018

वर्धा येथे लोकजागर पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. 

आर्वी (जि. वर्धा) - येत्या निवडणुकीत विधानसभेच्या 288 जागेबरोबरच काही ठिकाणी लोकसभाही लोकजागर पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात लढवणार आहे. याबाबत लवकरच नागपूर येथे बैठक घेतली जाणार आहे. अशी माहिती लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. द्यानेश वाकोडकर यांनी दिली.

सोमवारी (ता. 21) सायंकाळी प्रा. संजय वानखेडे यांचे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. '१०० युवा, महाराष्ट्र नवा' हे आमचे ब्रिद आहे. शेतकऱ्यांच्या सर्व बाबींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून शेतकरी प्रश्नांसंदर्भात शासन गंभीर नाही. या निवडणूकीच्या रिंगणात शेतकऱ्यांच्या मुलांनी यासाठी लढाई लढण्यासाठी या प्रवाहात येणे अगत्याचे असून शेतकरी हितासाठी आमचा प्रयत्न आहे.' असे त्यांनी स्पष्ट केले.
 
या पत्रकार परिषदेला लोकसभा प्रभारी प्रा. संजय वानखेडे संघटन सचिव दगडुजी पडिले (लातूर) महासचिव महादेव मिरगे (मुंबई) युवा संघटक कौस्तुभ कावळे आणि पत्रकारांची उपस्थिती होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Lokjagar Party has been formed at Wardha