Loksabha 2019 : काँग्रेसने देशाला मूर्ख बनविले - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

एक एप्रिल विदेशात एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. काँग्रेसने ५५ वर्षे हेच केले. आता जनता मूर्ख बनणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील जाहीर सभेत केले.

वर्धा - एक एप्रिल विदेशात एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. काँग्रेसने ५५ वर्षे हेच केले. आता जनता मूर्ख बनणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील जाहीर सभेत केले.

शिवसेना- भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, की  शेतकऱ्यांसाठी युती सरकारने प्रभावी पीकविमा योजना आणली. काँग्रेसने आपल्या काळात या जिल्ह्याकरिता कर्जमाफीस ५२ कोटी दिले, तर आम्ही ४९८ कोटी रुपये दिले. ३१ मार्चला मागील वर्षीचे वहीखाते पूर्ण झाले. आता नवीन वहीखात्यात आम्हाला अधिक प्रेम पाहिजे. 

आठवलेंच्या कवितांनी हशा
‘सबका साथ, सबका विकास ये नारा, इस में जाग रहा है भारत सारा’, ‘मी काँग्रेसला सोडलं, मोदींनी काँग्रेसला गाडलं’, ‘घर घर बोल रही है दादी, दोबारा प्रधानमंत्री बनेंगे मोदी’, ‘आता महाराष्ट्रात एकत्र आले आहे भाजप, रिपाइं आणि शिवसेना, पाहा काँग्रेसची कशी होते दैना’, अशा काव्यपंक्तीद्वारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मतदारांमध्ये हशा पिकविला. काँग्रेसने बहुजन समाज आणि दलित समाजाची अवहेलना केली, असा आरोप आठवले यांनी केला.

Web Title: Loksabha Election 2019 Congress Devendra Fadnavis Politics