पवार किंवा चव्हाणांनी गडकरींविरुद्ध लढावे - प्रकाश आंबेडकर

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

नागपूर - ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते नितीन गडकरी यांच्या कामांची तर ते नेहरूंच्या धोरणांची प्रशंसा करीत आहे; त्यावरून भाजप व काँग्रेसचे साटेलोटे असल्याचे दिसून येते. हे  खरे नसेल तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरींच्या विरोधात नागपूरमधून लढण्याची हिंमत दाखवावी, असे मत वंचित आघाडीचे  नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम उमेदवार दोन्ही काँग्रेसकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूरला कार्यक्रमासाठी जात असताना आंबेडकर यांनी रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. अलीकडेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची प्रशंसा केली होती. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही बाके वाजवून त्यांचे अभिनंदन केले होते. 

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंमतवाला अशी उपाधी दिली.  दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू  यांच्या धोरणावर टीका करीत असताना गडकरी उलट मत व्यक्त करीत आहेत. यावरून काय समजायचे, असा सवालही आंबेडकर यांनी केला.

काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे सातत्याने वंचित आघाडीने महाआघाडीत सहभागी होण्याची विनंती केली  जात आहे. आमची प्रमुख मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीयअंतर्गत आणावे ही आहे. यासाठी आघाडीला रोडमॅप दिला असून, २८ फेब्रुवारीपर्यंतच अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर वंचित आघाडी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करतील, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे.

पाकिस्तानची आर्थिक कोंडी करा
पाकिस्तानमध्ये शिरून ‘जैश ए मोहम्मद’च्या चौक्‍या नष्ट केल्याने आंबेडकर यांनी भारतीय वायुसेनेच्या हिंमतीला दाद दिली. पाकिस्तानच्या मुद्यावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. आता भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करावी, असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com