तोतया पोलिसांनी राज्यभरात कोट्यवधी लुटले

नागपूर - बनावट नोटा विकणाऱ्या टोळीसह सहनिरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के आणि पथक.
नागपूर - बनावट नोटा विकणाऱ्या टोळीसह सहनिरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के आणि पथक.

नागपूर - एक लाख रुपयांत तीन लाखांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून राज्यभरात कोट्यवधीने गंडा घालणारी टोळीला डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. टोळीचा म्होरक्‍या फरार झाला असून तिघांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के यांनी प्रतापनगर हद्दीत खामला रोड, सीतानगर, शनिवार बाजार नागपूर येथे शैलेश भय्याजी रणदिवे (30, वैशालीनगर, पाचपावली), कौस्तुभ चंद्रकांत टिकले (27, कामगारनगर) नितीन ऊर्फ लखन रूपचंद लोखंडे (28, रा. केळापूर दहेगाव, जि. वर्धा) यांना अटक केली होती. तर टोळीचा म्होरक्‍या संघपाल गाणार हा फरार झाला होता. ही टोळी गुंतवणुकीच्या तिप्पट बनावट नोटा पुरविण्याचे आमिष दाखवत होती. कुणी पैसे घेऊन आल्यास तोतया पोलिसांचा छापा घालून त्याला लुटत होती. पोलिसांना पैसे द्यावे लागतात, अन्यथा अटक होईल, अशी भीती घालून पैसे उकळत होती. बदनामीपोटी हेरलेला सावज पैसे देऊन स्वतःची सुटका करून घेत होता. अशाप्रकारे संघपाल गाणारने नागपूर पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांना टोळीत सहभागी करून घेतले होते, अशी माहिती आहे. बनावट नोटांचा व्यवहार होत असताना पोलिस छापा घालत होते. त्यानंतर लुटलेला माल आपापसात वाटून घेतला जात होता. कौस्तुभ टिकले याच्या खिशातून एका वृत्तपत्राचे ओळखपत्रही पोलिसांना मिळाले आहे, हे विशेष.  

यवतमाळातून कोटींत कमाई
संघपाल गाणार याने टोळीच्या माध्यमातून आतापर्यंत सोलापूर, लातूर, औरंगाबाद, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि यवतमाळातील धनाढ्यांना आमिष दाखवून कोट्यवधीने लुटले. यवतमाळ शहरातील अनेक व्यापाऱ्यांना जाळ्यात ओढून तोतया पोलिसांच्या मदतीने कोटींची कमाई केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.  

पोलिसांची वॉकीटॉकी आणि वर्दी
पैसे अदलाबदल करण्याचा व्यवहार करताना पोलिसांच्या वर्दीत असलेले तोतया पोलिस छापा घालत होते. पोलिसांना पाहून पैशाच्या बॅग तेथेच सोडून सर्वजण पळ काढत होते. मात्र, सावजाला पोलिस पकडत होते. अटक आणि बदनामीची भीती दाखविण्यात येत होती. त्या तोतया पोलिसांकडून दोन "वॉकीटॉकी' पोलिसांनी जप्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com