परराज्यातील लोकांना लुटून 'तो' झाला कोट्याधीश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नागपूर - आंबटशौकिनांना फोनवरून मैत्री आणि लैंगिक संबंधाचे प्रलोभन दाखवून लाखोंनी लुटणारी टोळी सक्‍करदरा पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीत चार सुंदर दिसणाऱ्या ललना आणि मास्टरमाइंड पाच आरोपींचा समावेश आहे.

या टोळीचा मास्टरमाइंड रितेश चामार (रा. राजस्थान) हा केवळ आठवीपर्यंत शिकलेला असून तो सध्या कोट्यधीश आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील हजारो आंबटशौकिनांना लुटून तो श्रीमंत झाला आहे. मास्टरमाइंड रितेश ऊर्फ भेरूलाल भगवानलाल चामार, सुवर्णा मिनेश निकम, पल्लवी विनायक पाटील, शिल्पा समीर सरवटे आणि निशा सचिन साठे यांना सोमवारी अटक केली.

टोळीचा म्होरक्‍या रितेश चामार हा मूळचा राजस्थानचा असून त्याचे केवळ आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. यापूर्वी तो एकाकडे अशीच नोकरी करायचा. तासाभरात हजारो रुपये हाती लागत असल्याने त्याने स्वतःचा धंदा सुरू केला. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने ठाणे येथील लेकसिटी मॉल येथे किरायाने पॉश ऑफिस घेतले. त्या ऑफिसमध्ये तो सुटाबुटात वावरायचा. त्याने १६ सुंदर युवती नोकरीला ठेवल्या होत्या. फोनवरून ग्राहकांना कसे जाळ्यात ओढायचे, याचे प्रशिक्षण देत होता. त्यानुसार त्या सर्व तरुणी फोन करून अनेकांशी गोड गोड बोलून फसवीत होत्या.

महागुरू लुटतो विदेशींना
रितेश हा ज्याच्याकडे पूर्वी नोकरी करायचा तो सध्या विदेशातील नागरिकांना लुटतो. फसवणुकीच्या सर्व टिप्स आणि प्रशिक्षण महागुरूने दिले असून पूर्वी तोसुद्धा देशभरातील आंबटशौकिनांना गंडा घालत होता. रितेश हा केवळ एक चेला आहे. महागुरूने आतापर्यंत कोट्यवधी रुपये कमावले असून तो इंटरनेटच्या माध्यमातून अशाच प्रकारे विदेशींना लुटत असल्याचा खळबळजनक खुलासा पोलिसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: loot cheating crime