सरकारी बंधनात हरवतोय "वेलतुरी माठ' 

file photo
file photo

वेलतूर (जि. नागपूर) :  एकेकाळी उन्हाळ्यातील गरिबांचा थंडपाण्याचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा वेलतुरात तयार होणारा खास सोड्याचा माठ कालौघात हरवत चालला आहे. हजारोंच्या संख्येने येथे तयार होणारा हा माठ आता बोटावर मोजता येईल येवढ्याच संख्येत तयार होत आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूरपर्यंतचे व्यापारी येथील माठाला खरेदी करून आपल्याक्षेत्रात "वेलतुरी माठ' म्हणून विकत असत. मात्र, आता ती स्थिती माती व सरपनाअभावी राहिली नसल्याचे कुंभारबांधव सांगत आहेत. 
तीपासून लोकोपयोगी भांडे बनवून पिढ्यांपिढ्या उदरनिर्वाह भागविणारा कुंभार समाज मातीसाठी व सरपनासाठी वनवन भटकत आहे. तळी, नाले व नदीकाठाची गाळाची माती आणून तिला गाळून, भिजवून, आंबवून लुसलुशीत गोळा करून तिला विविध आकार देत भांडी व इतर साहित्य बनविण्याचा मोठा पारंपरिक पिढीजात व्यवसाय वेलतुरातील कुंभार समाजाची कुटुंबे करतात. मात्र, गाळाची माती मिळेनाशी झाल्याने व सरकारी कर्मचाऱ्यांच्या ससेमिऱ्याने त्यांचा हा व्यवसाय पार मोडकळीस आला आहे. 
पूर्वी सहज व फुकटात मिळणारी ही माती आता तहसील कार्यालयातून परवानगी काढून आणावी लागते. त्यासाठी कागदपत्राची पूर्तता करताना स्थानिक अधिकाऱ्याचे खिसे गरम करावे लागत असल्याने विदारक सत्य कुंभार बांधव कथन करत आहेत. कच्या भांड्यांना भाजण्यासाठी लागणारे सरपण आधी नजीकच्या जंगलातून सहज व विनामूल्य आणता येत होते. आता कुऱ्हाड बंदीने त्याची ही मोठी अडचण निर्माण झाली आहे, हे विशेष. मोठ्याप्रमाणात भट्टीसाठी लागणारे सरपण विकत घेणे शक्‍य नसल्याने अनेक कुंभारबांधवांनी दुसरे मिळेल ती कामे करावयास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com