वाठोड्यात वीज खांबावर आकोडा टाकताना गमावला जीव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

अमरावती : जिल्ह्यात वाठोडा (शुक्‍लेश्वर) गावात घरात अवैध वीजपुरवठा घेण्यासाठी वीज खांबावरील विद्युत वाहिनीवर आकोडा टाकत असताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. निदान तुळशीराम तायडे (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी (ता. सात) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरात वीज नसल्यामुळे काही दिवसांपासून बांबूच्या साहाय्याने तायडे घरासमोरील विजेच्या खांबावर आकोडे टाकत वीज चोरी करीत होते. बुधवारी अशाचप्रकारे वीजचोरी करताना जोरदार धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे खोलापूर पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनीदेखील पाहणी केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lost life while throwing acacia on a power pole

टॅग्स