मुक्‍या प्राण्यांना एक घास प्रेमाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सेलू (जि.वर्धा) : प्राणीमात्रावर दया दाखवा आणि निसर्गाचा बिघडता समतोल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सेलूतील फिरता फिरता ग्रुपच्या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने वानरांना एक घास प्रेमाचा हा उपक्रम राबवीत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने श्रीक्षेत्र चौकी येथे मुक्‍या प्राण्यांसाठी स्वयपांक करीत पंक्तीच्या माध्यमातून त्यांना जेवण दिले. येथील वन परिसरातील भटक्‍या वन्यजीवांनी या मेजवानीचा चांगला आस्वाद घेतला.

सेलू (जि.वर्धा) : प्राणीमात्रावर दया दाखवा आणि निसर्गाचा बिघडता समतोल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सेलूतील फिरता फिरता ग्रुपच्या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने वानरांना एक घास प्रेमाचा हा उपक्रम राबवीत एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने श्रीक्षेत्र चौकी येथे मुक्‍या प्राण्यांसाठी स्वयपांक करीत पंक्तीच्या माध्यमातून त्यांना जेवण दिले. येथील वन परिसरातील भटक्‍या वन्यजीवांनी या मेजवानीचा चांगला आस्वाद घेतला. सेलूतील या निसर्गप्रेमी मित्र परिवाराने प्राणी मात्राविषयी असलेला कळवळा पाहता त्यांच्यासाठी 45 डझन केळी, तीन पायली फुटाने, स्वतः पोळ्याचा स्वयपांक करीत तेथील या मुक्‍या प्राण्यांना एक मेजवानी दिली. त्यानी राबविलेल्या "एक घास प्रेमाचा' या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक उपस्थित वानरांनी या पंक्तीच्या माध्यमातून जेवणाचा आस्वाद घेतला. त्यांनी प्राणीमात्रांवर दाखविलेल्या दयेमुळे त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले. या निसर्गप्रेमी मित्र परिवाराच्या 32 सदस्यांनी स्वतःच्या घरची कणीक व रक्कम जमा करून हा उपक्रम राबविला. यासाठी या ग्रुपचे मंगेश भुते, अमर सावरकर, प्रशांत डुकरे, आकाश पोहाणे, अमोल बुधबावरे, राजू तुरकर, नितीन लाडे, ललित पोहाणे, राकेश कोल्हे, मोरू सयाम, दत्ता वाघमारे, प्रवीण कावळे, मयूर हटवार, दिनेश हेडाऊ, सूरज राऊत, प्रवीण भगत, निखिल सावरकर आदींनी यात सहभागी होत मदतीचा हात दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A love of grass for the animals