प्रेम एकीशी, साक्षगंध दुसरीशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

नागपूर : वयाने चार वर्षे मोठ्या असलेल्या प्रेयसीचे सुमारे साडेतीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच मुलीसोबत साक्षगंध उरकवून घेणारा प्रियकर गौरव वानखेडे (29, रा. पंचतारा सोसायटी, मनीषनगर) याच्याविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय युवती अंबाझरी हद्दीत वास्तव्यास आहे. एकाच भागात काम करीत असल्याने दोघेही एकत्र आले. वयातील तफावतीची कल्पना असूनही त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. दोघांनी सोबत जगण्या मारण्याची शपथ घेतली. गौरववर विश्‍वास ठेवून युवतीने सर्वस्व अर्पण केले. जानेवारी 2016 मध्ये त्यांच्यात संबंध निर्माण झाले. त्यानंतर संधी मिळेत तेव्हा गौरव युवतीला राहत्या घरासह अन्य ठिकाणी नेऊन अत्याचार करीत होता. 16 जुलैपर्यंत दोघांचे संबंध सुरळीत होते. दरम्यान, त्याने दुसऱ्याच मुलीसोबत गुपचून साक्षगंध उरकून घेतले. त्यानंतर युवतीला लग्नास नकार देत अज्ञात स्थळी पळून गेला. गौरवसंदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत असताना युवतीला त्याच्या साक्षगंधाबाबत माहिती मिळाली. गौरवने फसगत केल्याचे उघडकीस येताच तिने बेलतरोडी ठाणे गाठून कैफियत मांडली. त्या आधारे पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love triangle news