साहेब, माझं हृदय चोरीला गेलंय हो...

Heart
Heart

नागपूर - पोलिस दलातील मोठ्या साहेबांचा फोन खणखणतो... तरुण भेदरलेल्या अवस्थेत ‘साहेब, माझं हृदय चोरीला गेेलंय होऽऽऽ’ असे बोलून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा हट्ट करतो. या तक्रारीनंतर पोलिस अधिकाऱ्यांनीच तरुणासमोर हात जोडले. त्याचे समुपदेशन करून प्रेयसीशी मनोमीलन करून दिल्याची माहिती आहे.

‘चुरा लिया है तुमने जो दिल को...’ हे हिंदी चित्रपटातील गाणे तुम्ही अनेकवेळा ऐकले असेल. मात्र, नागपुरात महाविद्यालयीन तरुणाने काहीशी अशाच आशयाची तक्रार पोलिसांकडे केली. तरुणीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या तरुणाने ‘तरुणीने माझे हृदय चोरले’ अशी तक्रार पोलिसांकडे दिली. आता ती त्याच्यापासून दूर राहत आहे. पोलिसांनी त्याचे चोरी गेलेले हृदय परत मिळवून द्यावे आणि प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असा त्याचा हट्ट होता. तरुणाच्या या जगावेगळ्या तक्रारीमुळे पोलिस अधिकारीही चक्रावून गेले.

हृदय चोरीला जाणे, हा पोलिसांचा विषय आणि कार्यक्षेत्र नाही, असे हृदय चोरीला गेल्याची तक्रार करणाऱ्या तरुणाला कळवण्यात आले. मात्र, साहेबांनी गांभीर्याने विचार करून त्या तरुणाला कार्यालयात बोलावून घेतले. त्याच्याशी चर्चा केली. त्याची ‘छोटीशी लव्हस्टोरी’ समजून घेतली. त्यानंतर प्रेयसीला फोन लावून बोलवले. दोघांच्याही मनातील गाळ ‘प्रवचनाचे बोल’ देऊन स्वच्छ करण्यात आला. दोघांचेही समुपदेशन करून समजूत घालण्यात आली.

प्रेम आंधळे असते. त्यात प्रेमात आकंठ बुडालेले अनेक प्रेमवीर आपले प्रेम मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या लढवत असतात. मात्र, प्रेमात अपयश येत असल्याचे पाहून थेट पोलिसांच्या दारापर्यंत पोहोचणारा हा प्रेमवीर सर्वांपेक्षा हटकेच म्हणावा लागेल आणि त्यामुळेच सध्या नागपुरात त्याची सर्वत्र चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com