बुलडाण्यातील प्रेमीयुगुलास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

सदर घटना आहे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा बस स्टॅन्डवरील. सदर परिसरात प्रेमीयुगुल हे 15 एप्रिलला दुपारी 2 वाजेदरम्यान बसलेले असताना बेदम मारहाण करण्यात येते. प्रेमाच्या नव्याने आणाभाका घेत असलेल्या या  प्रेमीयुगुलाला भरदुपारी नांदुरा बसस्थानक परिसरात बेदम मारहाण करण्यात आली होती.

बुलडाणा : जिल्ह्यातील नांदुरा बसस्थानक...प्रेमीयुगुल फलाट क्रमांक 4 वर बसलेले... अचानक काही लोक येतात आणि लाथाबुक्क्यांनी व डिस्टबिन डोक्यात घालत मुलाला मारहाण करतात...काही उपस्थित नागरिक चुपचाप चित्रिकरण करतात... काही वेळाने प्रेमीयुगुल आणि मारहाण करणारे दुचाकीवर बसून फुरर होता. परंतु, घटनेच्या वेळी काढलेला व्हिडिओ इतका व्हायरल होतो का सोशल मीडियावर काही तासातच अनेकांच्या चर्चेचा विषय होतो.आता याप्रकरणी मारहाण झालेल्या मुलाच्या तक्रारीवरून  गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी यामध्ये दोघांना ताब्यातही घेतले आहे.

सदर घटना आहे बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा बस स्टॅन्डवरील. सदर परिसरात प्रेमीयुगुल हे 15 एप्रिलला दुपारी 2 वाजेदरम्यान बसलेले असताना बेदम मारहाण करण्यात येते. प्रेमाच्या नव्याने आणाभाका घेत असलेल्या या  प्रेमीयुगुलाला भरदुपारी नांदुरा बसस्थानक परिसरात बेदम मारहाण करण्यात आली होती. तरुणीच्या नातेवाईकांनीच ही मारहाण केल्याचे समोर आले असून, मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या नातेवाईकांना काही दिवसांपूर्वी लागली असल्याचे कळते.

यानंतर नातेवाईकांनी मुलीला समज देवूनही ती प्रियकराला या ना त्या कारणाने भेटतच होती. यानंतर मात्र,  मुलीच्या नातेवाईकांनी दोघांवरही करडी नजर ठेवली होती. दरम्यान, 15 एप्रिलला नांदुरा बसस्थानकात दोघे बोलत बसल्याचे नातेवाईकांना दिसताच दोघांना बेदम मारहाण केली. याबाबत नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lovers beaten in Buldhana case filed