लग्नाला विरोध; प्रेमियुगलाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

नागपूर - एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमियुगुलांनी आईवडील लग्नाला विरोध करीत असल्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. नितीन शंकर मौंदेकर (वय २०, तांडापेठ, पाचपावली) आणि ऐश्‍वर्या पांडुरंग तळेवाले (वय २०, रा. लालगंज) अशी मृतांची नावे आहेत.

नागपूर - एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या प्रेमियुगुलांनी आईवडील लग्नाला विरोध करीत असल्याने फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. नितीन शंकर मौंदेकर (वय २०, तांडापेठ, पाचपावली) आणि ऐश्‍वर्या पांडुरंग तळेवाले (वय २०, रा. लालगंज) अशी मृतांची नावे आहेत.

नितीन आणि ऐश्‍वर्या हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते. दहावीपासून दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. नितीनला तीन मोठे भाऊ असून, ते लहानपणापासून आत्याकडे राहतात. वडील रिक्षाचालक असून, ते आईसह वेगळे राहतात. तिघेही भाऊ शिलाई मशीनच्या कारखान्यात कपडे कटाईचे काम करतात. नितीन हा कमला नेहरू कॉलेजमध्ये बीसीसीएच्या अंतिम वर्षाला शिकत होता. सोबतच घरची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसल्याने मोबाईल कस्टमर केअरमध्ये काम करीत होता. 

ऐश्‍वर्या ही लालगंज येथे आई पूनम, भाऊ आकाशसह राहत होती. ती पांडव कॉलेजमध्ये बीसीसीएच्या अंतिम वर्षाला शिकत होती. दोघांच्याही प्रेमाची कुणकूण त्यांच्या घरच्यांना लागली होती. नितीनच्या भावांनाही प्रेमप्रकरणाची माहिती होती. मात्र, त्यांनी विरोध दर्शविला नाही. ऐश्‍वर्याच्या घरच्यांचा यास कडाडून विरोध होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोघेही तणावात होते. शेवटी त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. दोघेही शनिवारी दुपारी दोन वाजता फुटाळा तलावावर गेले. काहीवेळ गप्पा केल्यानंतर साडेतीन वाजता दोघांनीही पाण्यात उडी घेतली. तलावावरील काही युवकांच्या लक्षात प्रकार आला. त्यांनी आरडाओरड केली. पण तोपर्यंत दोघांचाही जीव गेला होता. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी दोघांचेही मृतदेह पाण्यातून काढून मेडिकलमध्ये दाखल केले. 

कालच घातली समजूत..
प्रेमप्रकरणाची दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. तीन दिवसांपूर्वी ऐश्‍वर्याच्या आईच्या वाढदिवसाला नितीन घरी गेला होता. त्यावेळी ऐश्‍वर्या सोबतच्या संबंधाबाबत तिच्या आईने नितीनची समजूत घातली होती. तेव्हापासून नितीन आणि ऐश्‍वर्या दोघेही तणावात होते. ताटातूट होणार हे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखा निर्णय घेतल्याची माहिती 
सूत्रांनी दिली.

Web Title: Lovers couple's suicide

टॅग्स