यवतमाळ मतदारसंघ : मदन येरावर यांचा विजयी जल्लोष | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावर विजयी झाले. त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.25) शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

सजवलेल्या विजयी रथावर विजयी उमेदवार मदन येरावर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड व पराग पिंगळे आदींची उपस्थिती होती. विजयी रथाच्या मागे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येत मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे बोधचिन्ह असलेले कमळाचे फ्लेक्‍स व ध्वज कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. फटाक्‍यांच्या आतषबाजीत व ढोलताशांच्या निनादात दुपारी शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक निघाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madan yeravar celebrated victory : Election Results 2019