जानकर म्हणतात, 'इनकमिंग'चा भविष्यात भाजपला धोका नक्की

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी 120 कोटींचे होते. आता ते सात हजार कोटींवर गेले आहे. भाजपकडे राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेच्या 57 जागांची मागणी केली आहे.

नागपूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेते भाजपमध्ये येत आहेत. यामुळे संधी हिरावल्या जात असल्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज आहेत. भविष्यात याचा फटका भाजपला बसू शकतो, अशी धोक्‍याची सूचना पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी भाजपला दिली.

राष्ट्रीय समाज पक्षातर्फे संताजी सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळावा, ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी सक्षम नाही. त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नसल्याने राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला दिलेला शब्द पूर्ण केला. पशुसंवर्धन विभागाचे बजेट आधी 120 कोटींचे होते. आता ते सात हजार कोटींवर गेले आहे. भाजपकडे राष्ट्रीय समाज पक्षाने विधानसभेच्या 57 जागांची मागणी केली आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक जागा द्यावी. नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा मतदार संघाचीही आपण मागणी केल्याचे जानकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahadev Jankar statement on opposition leaders Incoming in BJP