‘महाजनादेश’च्या मागे काँग्रेसची ‘पोलखोल’

Congress
Congress

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. यापाठोपाठच काँग्रेसची ‘पोलखोल’ यात्रा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे. त्यानंतर २६ ऑगस्टपासून माजी खासदार आणि काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीमधून ‘पोलखोल’ यात्रेचा प्रारंभ काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. सरकारने केलेली जी कामे मुख्यमंत्री जनतेला सांगतील, त्याचीच ‘पोलखोल’ काँग्रेसची यात्रा करणार असल्याचे समजते. 

तत्पूर्वी, २२ ऑगस्टला दिल्लीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम करण्यात येणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले. पटोलेंच्या ‘पोलखोल’ यात्रेवरून काँग्रेसमध्येच मतभेद, नाराजी असल्याची चर्चा आज पसरली होती. विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. नाना पटोले यांच्या ‘पोलखोल’ यात्रेवरून पक्षात नाराजी आहे. पटोले यांनी लोकसभा निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी यात्रेचे आयोजन केले आहे. यात्रेच्या नियोजनात वरिष्ठ नेत्यांना विचारले नाही, प्रचाराबाबत ठोस कार्यक्रम नाही, त्यामुळे ही नाराजी आहे. पटोले यांची कार्यपद्धती काँग्रेसमधील नेत्यांना पटत नाही, अशी माहिती आज समाजमाध्यमांवर पसरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com