देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी यात्रा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील देऊळगाव वळसा येथे महालक्ष्मी संस्थानच्या वतीने आज, गुरुवारपासून महालक्ष्मीच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा शनिवारपर्यंत (ता. सात) असेल. उद्या, शुक्रवारी मराठी सिनेअभिनेत्री अलका कुबल महाउत्सवात सहभागी होणार आहे.

येथून सहा किलोमीटर अंतरावर देऊळगाव (वळसा) येथे विदर्भातील एकमेव महालक्ष्मीचे मंदिर आहे. येथे गुरुवार, शुक्रवार व शनिवारला तीन दिवस महालक्ष्मी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, गुरुवारी महालक्ष्मीची पालखी निघाली. सायंकाळी सातला गौरी आवाहन तर शुक्रवारी सकाळी सहा वाजता पंचकुंडी यज्ञ, पूजा व हवन होईल. सकाळी अकराला यज्ञ पूर्णाहुती आरती तर सायंकाळी सहा वाजता संगीतमय महाआरती होणार आहे. शनिवारी सायंकाळी सहाला संगीतमय आरती होणार आहे. याच दिवशी सकाळी 12 ते चारपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मोफत प्रवासाची सोय
या तीन दिवस यात्रा महोत्सवासाठी दारव्हा ते देऊळगाव (वळसा) व देऊळगाव (वळसा) ते दारव्हा मोफत प्रवासाची सोय महालक्ष्मीच्या भक्तासाठी करण्यात आलेली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahalaxmi Yatra begins at Dalgaon Valsa