महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भात चोख बंदोबस्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गुरुवार, 9 ऑगस्ट रोजी आंदोलकांनी "महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील सर्व जिल्ह्यांत चोख बंदोबस्त आहे. जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक वाटल्यास शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे तर एसटी सेवा बहुतांश भागात बंद राहणार आहे. गुरुवारी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आरक्षणाची मागणी जोरकसपणे करणार आहेत. त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.
अहिंसेच्या मार्गाने आंदोलन

बंदच्या काळात अहिंसेच्या मार्गाने आंदोलन होणार असल्याचे सकल मराठा संघातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र या परिस्थितीचा काही समाजकंटक गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन सकल मराठा संघातर्फे करण्यात आले आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात आंदोलनाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज असल्याने पोलिसांचे या भागावर विशेष लक्ष राहणार आहे.

Web Title: maharashtra bandh vidarbha news