Breaking: पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून अखेर साडे १६ कोटींची मदत जाहीर. 

अथर्व महांकाळ .
Friday, 4 September 2020

महाराष्ट्र सरकारतर्फे पूरग्रस्त भागातील लोकांसाठी आणि त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी तब्बल १६.५० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून 'बिन बादल बरसात' अशी परिस्थिती नागपूरसह विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आहे. या जिल्ह्यांमधील अनेक गावांना महापुराचा प्रचंड फटका बसला आहे. इतकेच नाही तर नागपूर आणि विदर्भात १९९४ नंतर आलेला हा सर्वात मोठा पूर आहे.त्यामुळे सर्व स्तरातून पूरग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी ही मागणी जोर धरत होती. मात्र आता ठाकरे सरकारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. 

महाराष्ट्र सरकारतर्फे पूरग्रस्त भागातील लोकांसाठी आणि त्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी तब्बल १६.५० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. अचानक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे गावांमध्ये अक्षरशः पाणीच पाणी झाले होते. याचीच दखल घेत सरकारकडून पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे. 

 

 

या मदतीतून नागरिकांसाठी रोजच्या गरजेच्या वस्तू, धान्य, खाण्यापिण्याची सोय करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकता असल्यास आर्थिक मदतही करण्यात येणार आहे. तसेच यातून बेघर झालेल्या नागरिकांना पुन्हा घर बांधून देणार येणार आहे. 

.. तर विदर्भात महापूर आलाच नसता.. महापुराला जबाबदार कोण? ऐतिहासिक विसर्ग करण्याची खरंच गरज होती का?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा लावून धरला होता. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार यांनीही पूरग्रस्तांना मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता सरकारने मदत जाहीर केली आहे. यामुळे नक्की पूरग्रस्तांना फायदा होईल का हेच बघावे लागणार आहे.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra government announced package for flood affected area