esakal | भाजपला धक्का देत 'या' एकमेव मतदारसंघात वंचितची बाजी | Election Results
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Vidhan Sabha 2019 election result VBA lead in trends In murtizapur

मुर्तिजापूर
भाजप- हरीष पिंपळे - १५१५
राष्ट्रवादी कॉँग्रेस - रवीकुमार राठी - ८७०
वंचित आघाडी - प्रतिभा अवचार - २५३०

भाजपला धक्का देत 'या' एकमेव मतदारसंघात वंचितची बाजी | Election Results

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः भाजपचे विद्यामान आमदार हरीष पिंपळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे रवीकुमार राठी आणि वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभाताई अवचार रिंगणात आहेत. आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभाताई अवचार यांनी ३८५३ मतांची आघाडी घेतली आहे. यामध्ये भाजपला १५१५ मते तर राष्ट्रवादीला ८७० मते मिळालेली आहेत.

विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या मूर्तिजापूर मतदारसंघातील विद्यमान आमदाराविरुद्ध भाजपमधून झालेली बंडखोरी, शिवसेनेचा असहकार आणि डॉ. रणजित पाटील यांच्याबाबत आमदार हरीश पिंपळे यांनी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य यामुळे येथे भाजपच्या अडचणी वाढल्याचे चित्र आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रविकुमार राठी यांच्यासाठी शहर पवार यांनी केलेली बॅटिंग वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महिला उमेदवार यामुळे मूर्तिजापूरमध्ये सुरुवाताली एकतर्फी वाटणारी लढत आता तिरंगी होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत.

मुर्तिजापूर
भाजप- हरीष पिंपळे - १५१५
राष्ट्रवादी कॉँग्रेस - रवीकुमार राठी - ८७०
वंचित आघाडी - प्रतिभा अवचार - २५३०