Vidhan Sabha 2019 : साकोली (जि. भंडारा) : पटोले, फुकेंची प्रतिष्ठा पणाला

Parinay-and-Nana
Parinay-and-Nana

विधानसभा 2019 : २००४ आणि २००९ या दोन वर्षी येथून काँग्रेस विजयी झाली होती. गतवेळी २०१४ मध्ये भाजपने विजय मिळविला. संघटनात्मकदृष्ट्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे २०१४ मध्ये भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, तीन वर्षातच त्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर टोकाची टीका करून राजीनामा दिला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजप नेतृत्वाने ही लढत प्रतिष्ठेची केलेली आहे. पटोलेंना पराभूत करायचेच, या इर्षेने भाजपने कुणबी समाजाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना समोर केले आहे. पटोले आणि फुके यांच्यातच थेट लढत होईल.

परिणय फुके
बलस्थाने

    कमी वेळात चांगला जनसंपर्क
    मंत्रिपदाचा फायदा मतदारसंघाला
    मुख्यमंत्र्यांच्या जवळचे
    युवकांमध्ये लोकप्रिय

कमजोरी
    ‘भेल’ प्रकल्पाबाबत निर्णय नाही
    जिल्ह्यात सर्वदूर संपर्क नाही
    मतदारसंघासाठी नवखे

नाना पटोले
बलस्थाने

    ओबीसी समाजाचे पाठबळ
    मोदीविरोधामुळे प्रसिद्धीचे वलय
    आक्रमक नेतृत्व असा लौकीक
    प्रफुल्ल पटेलांशीही जुळवून घेतले

कमजोरी
    सेवक वाघायेंची बंडखोरी
    बहुजन समाजाच्या पाठबळात घट
    मतविभाजनाची शक्‍यता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com