Maratha Kranti Morcha यवतमाळ जिल्ह्यात शांततेत बंद

चेतन देशमुख
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

यवतमाळ - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यात शांततेत बंद आहे. शाळा, महाविद्यालय, पेट्रोलपंप, प्रतिष्ठाने शंभर टक्के बंद आहे. सकाळी दहापर्यंत जिल्ह्यातून सुटणार्‍या 340 फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून, ये-जा करणार्‍या 1500 फेर्‍या रद्द करण्यात आल्या.

क्रांतिदिन पुकारण्यात आलेल्या बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केले आहे. बंदीसाठी जिल्ह्यातील व्यापारी, वाहनचालक, संस्था, शाळा, महाविद्यालय, पेट्रोलपंप तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा-कुणबी ठोक मोर्चा समितीने केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय,वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्याने शहरात रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.

Web Title: #maharashtrabandh maratha kranti morcha bandh in yavatmal