कर्ज पुरवठ्यासाठी महाशिबिर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

मुद्रा बॅंक योजना - 26 हजार अर्जदारांना 5 कोटींचे वाटप
नागपूर - पंतप्रधान मुद्रा योजना आणि उद्योगांसाठी तसेच स्टॅंडअप इंडिया व स्टार्टअप इंडियाअंतर्गत राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्ज पुरवठा प्रक्रियेमध्ये सुलभता आणावी. अर्जदाराने मागणी करताच तत्काळ कर्ज पुरवठा होईल, या दृष्टीने नियोजन करावे. कौशल्य प्राप्त युवकांना मुद्रा बॅंकअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मेगा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुद्रा बॅंक योजना समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी कृष्णा फिरके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, अग्रणी जिल्हा बॅंक प्रबंधक गुलाबराव कुंभारे, अशासकीय सदस्य श्रीराम बांधे, डिक्कीचे विजय सोमकुंवर, कौशल्य विकास विभागचे सहाय्यक संचालक डी. एम. गोस्वामी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भारती, तसेच विविध बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले, मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यात 26 हजार 166 अर्जदारांना 4 कोटी 84 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. जिल्ह्यातील कौशल्य प्राप्त बेरोजगार युवकांना तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडे व डिक्कीकडे अधिकृतपणे नोंदणी झालेल्या युवकांना मुद्रा योजनेचा लाभ सहज व सुलभपणे देण्यासाठी राष्ट्रीयीकृत सर्व बॅंकांनी उद्दिष्ट निश्‍चित करावे, अशी सूचना केली. मुद्रा बॅंक योजनेअंतर्गत युवकांसाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्‍यक आहे. मुद्रा बॅंकअंतर्गत कर्ज मेळावे तालुकास्तरावरही आयोजित करण्याच्या दृष्टीने बॅंकांच्या समन्वयाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

युवकांसाठी मार्गदर्शन मेळावे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेता यावा, यासाठी विशेष मार्गदर्शन मेळावे आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. अग्रणी जिल्हा प्रबंधक गुलाबराव कुंभारे यांनी विविध बॅंकांनी या योजनेअंतर्गत वाटप केलेल्या कर्जासंदर्भात माहिती दिली.

Web Title: mahashibir for Loan supply