महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर

महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर

अकोला: 'हर हर महादेव'च्या घोषात पवित्र शिवलिंगांवर केलेला अभिषेक, शिवलिलामृत पारायण, बेल- फुले अर्पण करत आज जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी करण्यात आली. शहरातील श्री राज-राजेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. तर बारा ज्योतिर्लिंग मंदिरात विविध ज्योतिर्लिंगांची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येत होती. यासोबतच विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.

महाशिवरात्रीनिमित्त आज फराळाच्या पदार्थांबरोबर फळांचीही मोठी उलाढाल झाली.

महाशिवरात्रीनिमित्त काल विविध मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथील राजेश्‍वर मंदिरावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आलेली होती. तेथे पहाटेपासून अभिषेक, पूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. सकाळी सहापासूनच येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळीही दर्शनासाठी रांग लागलेली होती. शनिवार, रविवारसोबतच महाशिवरात्रीची सुटी लागून आल्याने शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह मंदिरात भाविकंच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. 

फळांच्या मागणी व दरात वाढ

कालपर्यंत केळी ३० रुपये डझनाने विकली जात होती, तर सफरचंद १२० रुपये किलो असा दर होता. महाशिवरात्रीच्या उपवासामुळे आज फळांच्या दरात विक्रेत्यांनी वाढ केली होती. कमी दर्जाची केळीही ४० ते ५० रुपये डझनाने काही ठिकाणी विकली जात होती, तर सफरचंदाचा दर १५० रुपये सांगितला जात होता. सध्या द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. द्राक्षांच्या दरात मात्र काहीही वाढ झाली नाही. ८० ते शंभर रुपये किलोने द्राक्षे विकली जात होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com