महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

पंजाबराव ठाकरे
सोमवार, 30 एप्रिल 2018

श्रमदानाचा हा यज्ञ 22 मे पर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे 2018 संपूर्ण राज्यात महाश्रमदान होणार आहे.

संग्रामपूर (बुलढाणा) - तालुक्यातील खारपान पट्ट्यातील काकोडा गावात 1 मे ला एक हजारपेक्षा अधिक लोक महाश्रमदानात सहभागी होणार आहेत. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही यामध्ये सामील होण्यासाठी मुंबईवरून रवाना झाल्याची माहिती आहे. शेकडो हात देशासाठी काम करणार असून दोन तासाचे श्रमदान जलक्रांतीच्या चळवळीला दिशा दर्शक ठरणारे आहेत. त्यासाठी कुदळ, फावडे, टोपले ही पाणी फाऊंडेशन कडून उपलब्ध करण्यात आल्याचे तालुका समन्वयक प्रताप मारोडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी आणि सर्व खेडेगावांना पाणीदार करण्यासाठी पानी फाउंडेशनने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरात जल चळवळ उभी केली आहे. या चळवळीत लोकसहभागातून मोठे काम उभारलेल्या काकोडा या खारपान पट्टयाचा अभिशाप असलेल्या गावानेही मोठया हिरीरीने सहभाग घेतला आहे. सर्व ग्रामस्थ 8 एप्रिल पासून श्रमदान करीत आहेत. श्रमदानाचा हा यज्ञ 22 मे पर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्र दिनी 1 मे 2018 संपूर्ण राज्यात महाश्रमदान होणार आहे. या महाश्रमदानासाठी काकोडा गावची निवड पानी फाउंडेशनने केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील जलमित्र काकोडा गावात येऊन या महाश्रमदानात सहभागी होणार आहेत. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mahashramadan On Maharashtra Din